Deo Tibba Base Trek देव तिब्बा बेस ट्रेक

Schedule

Tue May 21 2024 at 06:00 am to Mon May 27 2024 at 05:00 pm

UTC+05:30

Location

Kullu - कुल्लू, Himachal Pradesh | Kasol, HP

Advertisement
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
"देव तिब्बा बेस ट्रेक"
जि. कुलू, हिमाचल प्रदेश
मंगळवार 21 मे ते सोमवार 27 मे 2024
सदस्य संख्या : फक्त 30वयो मर्यादा 15 ते 60 (नियमित ट्रेकिंग करणाऱ्या व्यक्तीलाच प्रवेश मिळेल)
शिवशौर्य ट्रेकर्सने आता पर्यंत 100 पेक्षा जास्त मोहीमा आयोजित करून यशस्वी केल्या आहेत त्यात सारपास, चंद्रखानी आणि बेदनी बुग्याल या हिमालयन ट्रेक्स, जंगल सफारी आणि सह्याद्रीतील गडकिल्ले यांचा समावेश आहे. शिवशौर्य ट्रेकर्स समाजाच्या सर्व स्तरातील सर्व वयोगटातील सर्वांनाच दऱ्या-खोऱ्यात, सोप्या-बिकट वाटांवरून सुखरुप फिरवत आली आहे. आता देव तिब्बा बेस हि हिमालयातील नवी वाट पादाक्रांत करूया.
ट्रेक चा दिनक्रम :
दिवस 1 (21 मे) :
रूमसु (बेस कॅम्प) येथे आगमन. Acclimatization आणि Orientation. ट्रेक विषयी माहिती / मार्गदर्शन.
दिवस 2 (22 मे) : रूमसु (बेस कॅम्प) पासून खानोल गाव पर्यंत जीपने प्रवास. खानोल पासून चिक्का पर्यंत ट्रेक (2 - 3 तास) आणि मुक्काम. साधारण 1 तासभर जंगल लागते. चिक्का येथे शंकराचे मंदिर आहे. इथे जवळच्या परिसरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.
दिवस 3 (23 मे) : चिक्का ते सेरी पर्यंत ट्रेक (6-7 तास) आणि मुक्काम. सेरी ठिकाण हे मोट्ठे पसरलेले गवताचे पठार आहे.
दिवस 4 (24 मे) : सेरी ते देवतिब्बा बेस नेहमीपेक्षा लवकर उठून ट्रेक ला सुरुवात. 5-6 तास ट्रेक करून टेंटा येथे पोहचू. त्यातील २ तास खडी चढण आहे. टेंटाला पोहचल्यावर इथूनच देव तिब्बा आणि ईंद्रासन शिखराचे दर्शन होते. त्यानंतर ३ तासांच्या ट्रेक नंतर आपण देवतिब्बा बेस या कॅम्प वर पोहचू आणि मुक्काम करू.
दिवस 5 (25 मे) : देव तिब्बा बेस पासून (4-5 तास) ट्रेक करून छोटा चंद्रताल येथे पोहचू. त्यानंतर आल्या मार्गाने टेंटा येथे येऊन मुक्काम
दिवस 6 (26 मे) : टेंटा ते चिक्का (5 तास) सोपी उतरण. ट्रेक मधील शेवटची रात्र. चिक्का येथे मुक्कामाच्या ठिकाणी शेकोटी करून गप्पा-गाणी-मजा करत दिवसाची सांगता.
दिवस 7 (27 मे) : चिक्का ते जगतसुख सोपी उतरण (2 तास) ट्रेक करून जगतसुख या ठिकाणी ट्रेकची समाप्ती. त्या नंतर रूमसु (बेस कॅम्प) पर्यंत जीप प्रवास (1 तास). रूमसु येथे फ्रेश होऊन, प्रमाणपत्र घेऊन आपपल्या मार्गाने परतीचा प्रवास सुरु.
ट्रेक मधील अंतर्भूत गोष्टी :
1. रूमसु ते रूमसु खर्च (दिनांक 21 मे नाश्ता ते 27 मे दुपारच्या जेवणापर्यंत)
2. रात्री झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग
3. ट्रेक दरम्यान सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे शाकाहारी जेवण, चहा
4. स्थानिक सरकारी सर्व परवानग्या आणि शुल्क
5. प्राथमिक उपचार औषधे, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिमीटर (गाईड कडे उपलब्ध)
6. वैक्तिक विमा
7. GST 5%

अंतर्भूत नसलेल्या गोष्टी :
1. आपापल्या शहरातून येण्या जाण्याचा प्रवास खर्च अंतर्भूत नाही
2. ट्रेक व्यतिरिक्तचे जेवण, चहा-पाणी, वैयक्तिक खरेदी ट्रेक शुल्कात अंतर्भूत नाही
3. ट्रेक मध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्याची जबाबदारी स्वतः ट्रेकरची राहील. वाटेत कोणत्याही कारणास्तव ट्रेक अपूर्ण सोडून बेसकॅम्पला परतायचे झाल्यास त्याचा खर्च वैयक्तिक असेल.
4. स्वतःसाठी पोर्टरची गरज वाटल्यास, पोर्टरची सोय करण्यात संस्था मदत करेल, परंतु पोर्टरचा संपूर्ण खर्च आणि जबाबदारी वैयक्तिक असेल.
5. ट्रेक सोडून बेसकॅम्पला राहण्याचा किंवा आपापल्या ठिकाणी नियोजित वेळेआधी जाण्याचा खर्च आणि जबाबदारी ट्रेक सदस्याची असेल. तरी, अशा आपत्कालीन वेळेसाठी पुरेशी रोख रक्कम ट्रेकमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्याने स्वतःच्या जबाबदारीवर आपल्यासोबत बाळगावी.

*सर्वात आधी खालील मुद्दयावंर मोहीम प्रमुखांशी बोलून घ्या :-
शिवशौर्य ट्रेकर्स रेल्वेचे आणि विमानाचे रिसेर्व्हशन बाबत मार्गदर्शन करेल . त्यासाठी मोहीम प्रमुखांशी फोन वर किंवा वैयक्तिक संपर्क साधावा.
मोहीम प्रमुख व बरीचशी मंडळी जाताना रेल्वेने व येताना विमानाने प्रवास करण्यास इच्छुक आहेत. जेवढे लवकर नियोजन कराल तेवढे सर्वांसोबत आणि विना त्रास आपल्या बेस कॅम्प वर पोहचणे होईल तसेच परतीचा प्रवास सुद्धा सर्वांसोबत होईल. विमानाचे बुकिंग शक्य तितक्या आधी केले तर प्रवास भाडे स्वस्त पडते. त्यामुळे दिवस / खर्च वाचेल. मात्र विमानाची भाडी apex fare नुसार वाढत असल्यानं ही भाडी फार काळ तशीच राहणार नाहीत, म्हणून लवकर निर्णय घेतला, तरच हा फायदा मिळेल).कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त स्थलदर्शन व अजून काही दिवस मनाली किंवा इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था मात्र (त्याची शिवशौर्य ट्रेकर्स संस्थेला आगाऊ कल्पना देऊन) स्वतः करायची आहे.*
अटी - नियम :-
1) आपली सॅक अकारण जड होणार नाही, काळजी घ्यावी. (8-10 किलो पेक्षा जास्त नसावी).
2) MBBS डॉक्टरचे सर्टिफिकेट (होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक नाही) भरून आपण या ट्रेकसाठी फिट आहोत याची खात्री करून ते सर्टिफिकेट मोहीमप्रमुख यांच्याकडे ट्रेकपूर्वी किमान 15 दिवस सुपूर्द करायचे आहे (सॉफ्टकॉपी चालेल). Trek application form आणि medical certificate form सहभागी सदस्यांना शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे पाठविण्यात येतील. ते भरून द्यायचे असतील.वय वर्ष 45 पुढील सदस्यांनी ECG काढणे आवश्यक आहे.
3) आयोजकांकडे Emergency मेडिकल किट आहे. तरी, प्रत्येक सदस्याने वैयक्तिक औषधे आणायचे आहे. हिमालयात प्राणवायूची कमतरता असल्याने सोबत कापूर बाळगावा.
4) ट्रेकमध्ये कोणत्याही प्रकारचे कोणत्याही कारणास्तव व्यसन करू दिले जाणार नाही. तसे आढळल्यास ट्रेकमधून बडतर्फ करण्याचे हक्क मोहीमप्रमुख व पर्यायाने शिवशौर्य ट्रेकर्स कडे असतील
5) ट्रेक सदस्याला आपली Haversack स्वतः आणता येईल. अन्यथा Haversack रूमसु येथे ट्रेकच्या कालावधी पुरत्या पुरवण्यात येतील. तसेच, आपले अतिरिक्त सामान रूमसु येथील बेसकॅम्प मध्ये ठेवण्याची व्ययस्था केली जाईल. मात्र, या सामानात कुठल्याही मौल्यवान वस्तू नसाव्यात, त्या असल्यास त्यांची जबाबदारी स्वतः सदस्यांची असेल. कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स त्याला जबाबदार राहणार नाही.
6) हिमालयात चालतील असे चांगल्या प्रतीचे बर्फात चालतील असे ankle length waterproof shoes ट्रेक सदस्याने ट्रेकसाठी घालायचे आहेत. बर्फात चालताना शक्यतो snow hand gloves वापरावेत.
7) हिमालयात मे महिन्यात रात्रीसुद्धा खूप प्रचंड गारठा असल्याने गरम कपडे ज्याने त्याने आपापल्या सोयी आणि गरजेनुसार आणायचे आहेत (किमान 1 thermals). तसेच, ट्रेक मध्ये ते स्वतः घेऊन चालायचे देखील आहे. (कानाला लागणारा मफलर, माकडटोपी, thermals, रात्री झोपताना woolen hand gloves, वूलन पायमोजे, windcheater, स्वेटर, ट्रेक करताना व रात्रीही पूर्ण बाह्यांचा (full sleeved) शर्टच घालावेत). चालताना मोज्यांचे 4-5 अतिरिक्त जोड बाळगावेत. बर्फ़ामुळे एक जोड ओला झाला तरीही पंचाईत होणार नाही.
8) Sunscreen लोशन (ऑपशनल), टोपी/ hat /cap व goggle (compulsory) टूथपेस्ट, टूथब्रश, रेनकोट, टॉर्च, batteries (+ extra cells) अशा वैयक्तिक गरजेच्या गोष्टी. बर्फावर सूर्यप्रकाश परावर्तित होऊन डोळ्यांना त्रास होऊन अंधत्व येऊ शकतं म्हणून गॉगल्सना पर्याय नाही. चष्मा लावणाऱ्यांनी किमान photochromatic चष्मा वापरावा. ह्या गोष्टी न आणल्यास ट्रेक सदस्याचीच खूप पंचाईत होणार आहे9) ताट, मग, Pack lunch साठी tiffin box, चमचा व पाण्याची बाटली, गरम कपडे स्वतःच आणावे.10) मोहीमप्रमुखांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात कोणताही बदल करायचा झाल्यास त्याचे सर्वाधिकार मोहीमप्रमुखांकडे राहतील.
11) मोहिमेत Guide किंवा मोहीमप्रमुखांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालणे बंधनकारक असेल.
12) शिवशौर्य ट्रेकर्स निसर्गाचे संगोपन करण्यास कटिबद्ध आहे. तरी, chocolate किंवा गोळ्यांचे wrappers वाटेत टाकू नयेत.
13) ट्रेकचे संपूर्ण शुल्क प्रत्येक सदस्याकडून आगाऊ घेतले जाईल. 1 ते 15 एप्रिल पर्यंत नाव रद्द करायचे झाल्यास भरलेल्या संपूर्ण रकमेच्या 25% रक्कम कापून उरलेली रक्कम सदस्यास परत केली जाईल. 16 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत 50% रक्कम कापून आणि त्यानंतर 100% कापली जाईल (कोणत्याही कारणास्तव refund मिळणार नाही)
ट्रेक फी: अंदाजे रु.11,000/- (फक्त बेस कॅम्प रूमसु ते बेस कॅम्प रूमसु पर्यंतचा खर्च अंतर्भूत).आजीव सदस्यांना ट्रेक फी रु. 10,750/- असेल नोंद : ट्रेक फी रु. 11,000/- हि "मे 2023" मधील खर्चानुसार अंदाजे जाहीर करीत आहोत. मे 2024 मधील ट्रेक खर्चात कदाचित थोडीशी वाढ होऊ शकते.
आपण आपली ट्रेक फी पुढील बँकेत भरू शकता.
Bank Details : - Bank of Maharashtra (Prabhadevi Branch)
A/c. No. 60134804616, IFSC Code : MAHB0000318, Branch Code : 000318
A/c. Name : SHIVASHOURYA TREKKERS
बँकेत शुल्क भरल्यावर त्वरित 9869109970 या क्रमांकावर कळवावे.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल
संपर्क :
अमित मेंगळे -(मोहीम प्रमुख) 9869109970
Advertisement

Where is it happening?

Kullu - कुल्लू, Himachal Pradesh, Adventurebug, Hospital Road, Main Bazar, Dhalpur, Kullu 175101, India,Kullu, Kasol

Event Location & Nearby Stays:

Shivashourya Trekkers \u0936\u093f\u0935\u0936\u094c\u0930\u094d\u092f \u091f\u094d\u0930\u0947\u0915\u0930\u094d\u0938

Host or Publisher Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स

It's more fun with friends. Share with friends

Discover More Events in Kasol

Free CSS PMS Seminar: Unlock Your Path to Success!
Mon May 27 2024 at 04:30 am Free CSS PMS Seminar: Unlock Your Path to Success!

Ahmedpur road opposite circuit house bahawalpur

WORKSHOPS
FARC-2024
Thu Jun 06 2024 at 09:00 am FARC-2024

IIT Mandi, Mandi, India 175005, Himachal Pradesh

BUSINESS CONFERENCES
PARVATI PSYCULTURE
Wed Jun 12 2024 at 10:00 am PARVATI PSYCULTURE

Oh magic view kasol

ART
Into the Woods of Himachal : Tirthan & Jibhi
Tue May 14 2024 at 10:00 am Into the Woods of Himachal : Tirthan & Jibhi

Tirthan Valley

TREKKING TRIPS-ADVENTURES
Deo Tibba Base Trek \u0926\u0947\u0935 \u0924\u093f\u092c\u094d\u092c\u093e \u092c\u0947\u0938 \u091f\u094d\u0930\u0947\u0915
Tue May 21 2024 at 06:00 am Deo Tibba Base Trek देव तिब्बा बेस ट्रेक

Kullu - कुल्लू, Himachal Pradesh

TRIPS-ADVENTURES TREKKING
Founder\u2019s Trek- Rasol-Kasol-Tirthan Valley
Fri May 24 2024 at 12:00 pm Founder’s Trek- Rasol-Kasol-Tirthan Valley

Jibhi

TRIPS-ADVENTURES TREKKING
Srikhand Mahadev Trek A pilgrimage Lord Shiva
Fri Jun 21 2024 at 10:00 am Srikhand Mahadev Trek A pilgrimage Lord Shiva

Jibhi Adventure

TRIPS-ADVENTURES TREKKING

What's Happening Next in Kasol?

Discover Kasol Events