AMAI Gudhi Padwa 2026
Schedule
Fri, 20 Mar, 2026 at 11:30 pm
UTC+13:00Location
Mt Eden War Memorial Hall | Auckland, AU
भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो.
छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संस्थापक, ज्यांच्या कार्यामुळे आपण अभिमानाने जगत आहोत, त्यांची जयंती सुद्धा आपण उत्साहाने साजरी करणार आहोत
चला तर मंडळी, आपण सर्वजण एकत्र येऊन हिंदू नववर्ष दिन - म्हणजेच गुढी पाडवा आणि शिवजयंती हे दोन्ही उत्सव आनंदाने साजरे करूया. आपण सहकुटुंब उपस्थित राहावे, ही मनःपूर्वक विनंती.
२१ मार्च २०२६
Mount Eden War Memorial Hall
सकाळी ९:३० पासून
आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या कलेला वाव देण्यासाठी, आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहोत. नृत्य, गायन, वादन, नाटिका, मुलांचे कार्यक्रम- सर्वांचे हार्दिक स्वागत आहे
EOI Performance link below :
https://forms.gle/WiT4n3AgjNNqdPFd7
🎨गुढी पाडवा अधिक रंगतदार बनवण्यासाठी, आपण आपल्या कलाकृती - विशेषतः ऐतिहासिक मराठी किल्ल्यांची
किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची रेखाटने/चित्रे - आम्हाला ई-मेल द्वारे पाठवा [email protected]
कार्यक्रम फक्त AMAI सदस्यांसाठी असून
RSVP -
https://forms.gle/zGq36QW5W8PGFxeYA अनिवार्य आहे.
कृपया आपल्या सुंदर मराठी पारंपरिक वेशभूषेत येऊन या उत्सवाची शोभा वाढवावी!
धन्यवाद,
ऑकलंड मराठी असोसिएशन
Where is it happening?
Mt Eden War Memorial Hall, 487 Dominion Road, Balmoral,Auckland, New ZealandEvent Location & Nearby Stays:



















