शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित दक्षिणात्य मराठेशाही मोहीम २०२५

Schedule

Thu, 25 Dec, 2025 at 05:00 pm to Sun, 28 Dec, 2025 at 06:00 pm

UTC+05:30

Location

चेन्नई | Chennai, TN

Advertisement
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित दक्षिणात्य मराठेशाही मोहीम २०२५
राज्य : तामिळनाडू
दिनांक : २५ ते २८ डिसेंबर २०२५
श्रेणी : मध्यम
मोहीम प्रमुख : संघमित्रा मेंगळे
मोहीम कार्यवाह : कुणाल राणे
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर हिंदवी स्वराज्य विस्तारासाठी आखलेली ही एकमेव मोहीम. डिसेंबर १६७६ ते मे १६७८ असा प्रदीर्घ काळ चाललेला हा प्रवास दक्षिण दिग्विजय म्हणून ओळखला जातो. त्याला तत्कालीन इतिहासात कारणे ही तशी घडत होती. आदिलशाही दरबारातले दिवसागणिक बदलणारे राजकारण, दक्षिणेतल्या नायक आणि पाळेगार घराण्यांतल्या कुरघोड्या, जिंजीचा सुभेदार नासिर मुहम्मद खानाचा दक्षिणेवर राज्य करण्याचा मनोदय, म्हणून हिंदू असलेल्या नायकांना मदत करावी, असा शिवाजी महाराजांचा व्यंकोजींना दिलेला सल्ला, तो व्यंकोजींकडून तडीस न जाणे, इत्यादी. ही अस्थिरता पाहता, दक्षिणेत स्वराज्याचा भगवा फडकावा, आणि भविष्यात अटळ असणाऱ्या मोगली आक्रमणापासून दूर एक संरक्षक जागा आणि उत्पन्न देणारा भाग असावा व दक्षिणेतून मोगल निपटून काढावा, अशा परिस्थितीतून या मोहिमेचा जन्म झाला, असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे.
दक्षिणेत कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मराठेशाहीच्या खूप मोठ्या पाऊलखुणा आहेत. या दाक्षिणात्य मराठेशाहीचा अनुभव घेण्याची संधी शिवशौर्य ट्रेकर्सने आणली आहे. त्यातली आपली मोहीम आहे तामिळनाडूमधील तीन ठिकाणी. वेल्लोर, जिंजी आणि तंजावूर.
राजगड आणि रायगडानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून तामिळनाडूत वसलेल्या किल्ले जिंजीला आपण भेट देणार आहोत. त्याचबरोबर वेल्लोर शहर स्थित वेल्लोरचा भुईकोट किल्ला जिंकून घेण्यासाठी बांधून घेतलेल्या २ किल्ल्यांची जोडगोळी - किल्ले साजरा व किल्ले गोजरा, आणि शहाजी राजेंचे पुत्र व्यंकोजीराजे भोंसले यांच्यापासून भोंसले घराण्याचे मराठा साम्राज्य तयार झालेले तंजावूर.
तर या दक्षिण मोहिमेत सहभागी होऊन महाराष्ट्राबाहेरील मराठा साम्राज्याला अभिवादन करूया.
कार्यक्रमाचा साधारण तपशील :
बुधवार २४ डिसेंबर :
संध्याकाळी १८:४० LTT MAS १२१६३ प्रस्थान
गुरुवार २५ डिसेंबर :
१६:१० चेन्नई आगमन
चेन्नईस्थित कालीकांबळ मंदिर. महाराज इथे येऊन गेल्याच्या नोंदी आढळतात
२५ संध्याकाळ
चेन्नई वेल्लोर बस.
रात्र मुक्काम वेल्लोर
शुक्रवार २६ डिसेंबर
किल्ले साजरा आणि किल्ले गोजरा
संध्याकाळ वेल्लोर किल्ला आणि जिंजीकडे प्रस्थान.
रात्र मुक्काम जिंजी.
शनिवार २७ डिसेंबर
किल्ले कृष्णगिरी, किल्ले राजगिरी
तंजावूरकडे प्रस्थान
रात्र मुक्काम तंजावूर
रविवार २८ डिसेंबर
तंजावूर मराठा पॅलेस, बृहदीश्वर मंदिर, सरस्वती महल, ग्रंथालय, व इतर..
२८ डिसेंबर रात्र पर्याय :
पर्याय १ :
२८ डिसेंबर ट्रेन : १६८६६ Uzhavan Express २१:५० तंजावूरहून
२९ डिसेंबर पहाटे ४:२५ चेन्नई Egmore (एळंबुर)
सकाळी ६:४५ चेन्नई Beach रेल्वे स्टेशनहून दादर (२२१५८) सुपरफास्ट
३० डिसेंबर पहाटे ५:१७ दादर आगमन
पर्याय २ :
२८ डिसेंबर रात्र तंजावूर चेन्नई वरील ट्रेन आणि
२९ डिसेंबर चेन्नई मुंबई सकाळी फ्लाइट
पर्याय ३ :
२८ डिसेंबर रात्री २१:५० ची त्रिची बेंगळुरू मुंबई विमान
२९ डिसेंबर पहाटे ५:१० मुंबई आगमन
या व्यतिरिक्त इतर पर्याय घेता येतील. संस्था केवळ अभ्यास करून त्यातल्या त्यात वरील पर्याय सुचवत आहे.
ट्रेक फी : संपूर्ण खर्च रु.९,८०० (रुपये नऊ हजार आठशे रुपये फक्त) प्रति व्यक्ती
आजीव सदस्यांना ट्रेक फी :- रु.९,४०० असेल (संस्थेचे ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे).
कमाल सदस्य संख्या ४० असेल.
अंतर्भूत खर्च :
- चेन्नई वेल्लोर जिंजी तंजावूर त्रिची AC बस प्रवास
- ⁠२५ डिसेंबर रात्रीचे जेवण, २६-२७-२८ नाश्ता, दुपार आणि रात्रीचे जेवण.
- ⁠२५-२६-२७ डिसेंबर रात्र : डबल/ ट्रिपल bed sharing हॉटेल
समाविष्ट नाही :
जाताना येतानाचे ट्रेन आणि/ किंवा विमानाचे तिकीट आणि त्या प्रवासादरम्यानचा कुठलाही खर्च.
विशेष सूचना :
लांबचा पल्ला असल्याने आणि तो काळ दक्षिणेत पर्यटनाचा हंगाम असल्याने स्थानिक हॉटेले आणि बसच्या आगाऊ आरक्षणाकरिता खालील प्रमाणे ट्रेक फी लवकरात लवकर भरावी:
नाव नोंदणीच्या वेळेस २,५००/- आगाऊ रक्कम,
३० सप्टेंबर : ३,०००/-
३१ ऑक्टोबर : ४,३००/- (मेंबर्स यांनी ३,९००/-)
नियम :-
१) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
२) या मोहिमेतल्या ठिकाणांच्या भेटी बऱ्याच घटकांवर अवलंबून आहेत. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे व कार्यकारिणीचे असतील.
३) सदर मोहिमेत काही आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
४) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
५) स्वतःच्या सामानाची जबाबदारी तुमची स्वतःची राहील.
६) कुठेही मोठा कॅमेरा वापरायचा असल्यास जिथे आवश्यक असेल तिथे ते शुल्क ज्याचे त्याने भरावे.
७) ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल.
8) मोहिमेत सदस्य संख्या मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे ट्रेक फी भरून नोंदविणे.
नाव नोंदणी प्रक्रिया :
१) ट्रेक फीचा पहिला हप्ता भरल्यावर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता संघमित्रा ९८१९ ६६२२५४ किंवा कुणाल ८८६९४ ९०१६७ या क्रमांकावर WhatsApp करावे. पैसे भरल्यानंतरच तुमच्या नावाची ट्रेकसाठी नाव नोंदणी होईल.
बँक तपशील :-
Account Name - SHIVASHOURYA TREKKERS
Account No - 60134804616
Bank Name - Bank of Maharashtra
Branch - Prabhadevi
IFSC Code - MAHB0000318
Branch Code - 000318
३) फी भरल्या नंतर सदर ट्रेकचा गूगल फॉर्म मोहीम प्रमुखांकडून मागून घ्यावा आणि तो Google Form इंग्रजीत संपूर्ण भरून सबमिट करावा.
4) नाव नोंदणी झाल्यावर "दक्षिण मराठेशाही मोहीम २०२५" या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या २ महिने आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
- किल्ले साजरा आणि गोजरा हे रीतसर ट्रेक आहेत, आणि साजरावर प्रचंड रान माजले असल्याने, ज्यांना ट्रेकची सवय आहे, अशांनी ट्रेकिंग शूज आणि लागल्यास पोल/ काठी आणावी.
- ⁠नावनोंदणी किंवा अधिक माहितीसाठी कुणाल आणि संघमित्रा यांच्याशी संपर्क साधावा. फोन न उचलल्यास Whatsapp मेसेज करून ठेवावा.
नाव नोंदणी रद्द प्रक्रिया :
१) नाव रद्द करायचे झाल्यास मंगळवार ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल.
२) ३० सप्टेंबर २०२५ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख - संघमित्रा मेंगळे / ९८१९ ६६२२५४
===========================
मोहीम कार्यवाह - कुणाल राणे /८१६९४ ९०१६७
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
शिवशौर्य ट्रेकर्स – मुंबई/९३२०७ ५५५३९
नाशिक - योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
वांद्रे - नम्रता सावंत / ९६१९७ ४५९७५
वसई – हार्दिक म्हात्रे/९०४९० १३६७७
खारघर - सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई - अजित नर / ९८१९५ ६६१२०
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/...
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers
Advertisement

Where is it happening?

चेन्नई, Chennai, India

Event Location & Nearby Stays:

Icon
Know what’s Happening Next — before everyone else does.
Shivashourya Trekkers \u0936\u093f\u0935\u0936\u094c\u0930\u094d\u092f \u091f\u094d\u0930\u0947\u0915\u0930\u094d\u0938

Host or Publisher Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स

Ask AI if this event suits you:

Discover More Events in Chennai

Communication Breakthrough - Speak with confidence + Public Speaking
Thu, 25 Dec at 10:00 am Communication Breakthrough - Speak with confidence + Public Speaking

SUPERBHUMANS - Personality Development training center in Anna Nagar

WORKSHOPS PUBLIC-SPEAKING
Baloon Fest
Thu, 25 Dec at 10:00 am Baloon Fest

Adyar

FESTIVALS MUSIC
Malank International Short Film Festival
Thu, 25 Dec at 12:00 pm Malank International Short Film Festival

Kamarajar Arangam: Chennai

ENTERTAINMENT COMEDY
duty time
Thu, 25 Dec at 01:30 pm duty time

Park Town, Tamil Nadu, India

CHRISTMAS
Carnatic 2.0 Live
Thu, 25 Dec at 01:30 pm Carnatic 2.0 Live

Karnataka Sangha HSS

ENTERTAINMENT MUSIC
SIVASRI SKANDAPRASAD presents BHAKTHI PARAVASAM
Thu, 25 Dec at 04:30 pm SIVASRI SKANDAPRASAD presents BHAKTHI PARAVASAM

Bharath Kalachar: Chennai

MUSIC ART
KPY VIjay TV artist Sekars Comedy Show [ Voice Mimicry , Singing Mimicry & Comedy ]
Thu, 25 Dec at 06:00 pm KPY VIjay TV artist Sekars Comedy Show [ Voice Mimicry , Singing Mimicry & Comedy ]

KMC, 814, Poonamallee High Rd, New Bupathy Nagar, Kilpauk, , Chennai, India 600010, Tamil Nadu

COMEDY ART
Kids Virtual Drawing Competition
Thu, 25 Dec at 06:00 pm Kids Virtual Drawing Competition

A79 Hotel: Chennai

ART CONTESTS
Dr. PADMA SUBRAHMANYAM's VALLUVARUM VEDANERIYUM
Thu, 25 Dec at 07:15 pm Dr. PADMA SUBRAHMANYAM's VALLUVARUM VEDANERIYUM

Bharath Kalachar: Chennai

MUSIC ART
MALLADI BROTHER's CLASSICAL CONCERT
Fri, 26 Dec at 04:30 pm MALLADI BROTHER's CLASSICAL CONCERT

Bharath Kalachar: Chennai

MUSIC ENTERTAINMENT
NARTHAKI NATARAJ's Bharatanatyam performance
Fri, 26 Dec at 07:15 pm NARTHAKI NATARAJ's Bharatanatyam performance

Bharath Kalachar: Chennai

MUSIC ART

What's Happening Next in Chennai?

Discover Chennai Events