किल्ले पारगड, किल्ले हनुमंतगड, निसर्ग पदभ्रमण मोहीम

Schedule

Sat Apr 29 2023 at 09:00 am

Location

Sawantwadi | Mumbai, MH

Advertisement
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित
किल्ले पारगड, किल्ले हनुमंतगड, निसर्ग पदभ्रमण मोहीम
तालुका : सावंतवाडी - दोडामार्ग - चंदगड, जिल्हा : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर
श्रेणी : सोपी
दिनांक : २९ ते ३० एप्रिल २०२३
कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी आंबोली घाटवर व कुडाळ वरून घाटावर जाणार्‍या हणमंत घाटावर लक्ष ठेवण्यासाठी पारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे. गडाला पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे. दक्षिणेला थोडया उतारानंतर खोल दरी आहे. शिवरायांनी या डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव "पारगड" ठेवण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हनुमंतगड हा किल्ला येतो. बांद्यापासून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या फुकेरी गावापर्यंत जाणारा रस्ता दाट जंगलातून जातो. पायथ्याचे फुकेरी गाव चारही बाजूने डोंगराने वेढलेले आहे.या निसर्गसंपन्न दाट वनराईतले किल्ले भ्रमंती झाल्यावरसुद्धा निसर्ग आपली साथ सोडणार नाही. आपला मुक्काम तितक्याच निसर्गसंप्पन गर्द झाडीत कोकणी घरात असेल. हे दोन संपूच नयेच असाच वाटत राहील.
कार्यक्रमाचा तपशील :-
शुक्रवार दि. २८ एप्रिल २०२३ रोजी प्रवास सुरु करून दुसऱ्या दिवशी शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी अंदाजे ९ वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकात जमणे. सकाळचे सोपस्कार आटपून घरून आणलेला नाश्ता करून बसने / जीपने किल्ले पारगडाकडे प्रस्थान. गडभ्रमंती झाल्यावर दुपारचे जेवण किल्ल्यावरच असेल. पारगडाहून वाहनानेच फुकेरी येथील किल्ले हनुमंतगडाकडे रवाना. किल्ले हनुमंतगड भ्रमंती करून झोळंबे येथील मुक्कामी रात्रीचे जेवण आणि रात्री आकाश दर्शनाचा कार्यक्रम आणि दिवसाची समाप्ती.
रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ वाजता चहा घेऊन निसर्ग भ्रमंती. मुक्कामावर पोहचून नाश्ता. दुपारचे जेवण आटपून सावंतवाडी कडे रवाना. सावंतवाडी राजवाडा, सावंतवाडी मोती तलाव, सावंतवाडी बाजारपेठ आपापल्या आवडी प्रमाणे फिरून आपल्या स्व-आरक्षित असलेल्या रेल्वे / बसच्या वेळेनुसार परतीचा प्रवास सुरु.
इच्छुक सदस्यांनी मुबंई वरून जाताना मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस (गाडी क्रमांक १०१११) किंवा मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (गाडी नंबर १२०५२) किंवा सावंतवाडी -मुंबई तुतारी एक्सप्रेस (गाडी नंबर ११००४) किंवा बस यापैकी गाड्यांचे उपलब्धतेनुसार आगाऊ आरक्षण स्वतः करणे आणि मोहीम प्रमुख किंवा मोहीम कार्यवाह यांना कळविणे.
ट्रेक फी : रु. १७००/- (रुपये एक हजार सातशे फक्त) प्रति व्यक्ती (सावंतवाडी ते सावंतवाडी प्रवास, रहाणे, चहा, नाश्ता, जेवण अंतर्भुत)
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रु. १,६००/- असेल.
("आजीव सदस्य ओळखपत्र" मोहिमेत बाळगणे बंधनकारक, ओळखपत्र असेल तरच सवलत मिळेल).
मोहिमेत सदस्य संख्या ३० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. नाव नोंदणीची अंतिम तारीख २० एप्रिल २०२३ असेल. मोहिमेत जागा शिल्लक असल्यास २० एप्रिल २०२३ नंतर ट्रेक फी : रु. १८००/- असेल. तेही जागा उपलब्ध असल्यास नोंदणी होईल.
आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ मोठी सॅक. सामान कमीत कमी आणावे.
२) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, गरज असल्यास चालताना काठी, रेनकोट, जरुरी पुरते कपडे, टूथब्रश, टूथ पेस्ट, साबण, टॉवेल.
३) २ लिटर पाणी, स्वतः पुरता सुका खाऊ.
४) अंथरुण, पांघरुण, टोपी, टॉर्च, कॅमेरा.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून अवकाळी आलेल्या पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.
नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) 'आवश्यक साहित्य' आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहिम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहिम प्रमुखांचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास २० एप्रिल २०२३ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २० एप्रिल २०२३ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
वरील सातही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र :-
मोहिम प्रमुख - विनायक पटवर्धन / ९०९६७ १९९९१/ ९६६५६०९९९१
====================
मोहिम कार्यवाह - अजित नर / ९८१९५ ६६१२०
नाव नोंदणी झाल्यावर "पारगड-हनुमंतगड मोहीम" या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या ७ दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
Bank Details:-
Bank Name - Bank of Maharashtra
Branch - Prabhadevi
Account No - 60134804616
IFSC Code - MAHB0000318
Branch Code - 000318
Account Name - SHIVASHOURYA TREKKERS
ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहिमांचे फोटो अल्बम पाहण्यासाठी लिंक :
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/...
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट :
http://www.shivashouryatrekkers.org
Advertisement

Where is it happening?

Sawantwadi, ,Mumbai, India

Event Location & Nearby Stays:

Shivashourya Trekkers \u0936\u093f\u0935\u0936\u094c\u0930\u094d\u092f \u091f\u094d\u0930\u0947\u0915\u0930\u094d\u0938

Host or Publisher Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स

It's more fun with friends. Share with friends