Mother's Day Special

Schedule

Sun, 09 May, 2027 at 12:30 pm

UTC+05:30
Location

Mumbai, India. | Mumbai, MH

Advertisement
Mother's Day Special:
*� आई नावाचं अथांग आभाळ: एक न सांगता आलेली गोष्ट �*
"आई, तुला काय समजतंय आजकालचं?" असं म्हणून मी रागात दरवाजा लावून घेतला...
बाहेर हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. काही वेळाने जेव्हा मी पाणी पिण्यासाठी खोलीबाहेर आलो, तेव्हा डायनिंग टेबलवर माझं आवडतं जेवण झाकून ठेवलं होतं. आई तिथे नव्हती, पण तिच्या हाताची चव त्या अन्नातून बोलत होती. जेवताना अचानक माझ्या नजरेत तिची ती जुनी, कडा झिजलेली साडी आली जी ती गेली दोन वर्ष सणावारालाही नेसतेय आणि मला आठवलं—गेल्याच आठवड्यात मी मात्र मॉलमध्ये जाऊन ब्रँडेड कपड्यांवर हजारो रुपये खर्च केले होते. तिने एकदाही स्वतःसाठी काही मागितलं नव्हतं. तेव्हा मला जाणीव झाली की, आई अशा कितीतरी गोष्टी आहेत ग, ज्या तू कधीच आम्हाला सांगत नाहीस...
*1. त्या अदृश्य अश्रूंची किंमत*
आम्ही आजारी असलो, की रात्र-रात्रभर जागून आमच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवणारी तूच होतीस. आमच्या सुखासाठी, आमच्या भविष्यासाठी तू देवापुढे कितीतरी वेळा पदर पसरून रडली असशील, पण आमच्यासमोर येताना मात्र तुझ्या चेहऱ्यावर नेहमी एक आश्वासक हसू असायचं. स्वतःचे डोळे पुसून आम्हाला हसवायला फक्त एक आईच शिकवू शकते.
*2. स्वतःच्या सुखाचा त्याग*
"मला भूक नाहीये, तुम्ही खाऊन घ्या," किंवा "मला हे आवडतच नाही, मला दुसरं काहीतरी चालेल," ही तुची वाक्यं खरी नव्हती ग. घरात कोणतीही चांगली गोष्ट आली, की ती आधी आमच्या ताटात पडावी म्हणून तू नेहमी स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःची भूक हसतमुखानं बाजूला सारलीस.
*3. शब्दांचे घाव आणि तिची माया*
कधी अभ्यासाच्या टेन्शनमध्ये, तर कधी ऑफिसच्या रागात आम्ही तुला काय काय उलट बोलून जातो. ते शब्द तुझ्या मनाला किती लागत असतील याची कल्पनाही करवत नाही. पण तरीही, काही क्षणात ते सगळं विसरून, "अरे, चहा ठेऊ का तुझ्यासाठी?" असं विचारणारं एवढं मोठं काळीज फक्त तुझ्याकडेच असू शकतं.
*4. हरवलेली स्वप्नं*
लहानपणी तुलाही काहीतरी बनायचं असेल, तुझीही काही स्वप्नं असतील. पण आमच्या जन्मानंतर तुझी सगळी स्वप्नं जणू आमच्या डोळ्यांत स्थिरावली. आमचं करिअर, आमचं लग्न, आमचं घर... यातच तू स्वतःचं अस्तित्व विरघळवून टाकलंस. आमची स्वप्नं पूर्ण होताना बघणं, हाच तुझ्या जगण्याचा ध्यास बनला.
*5. रात्रीची ती शांत प्रार्थना*
दिवसभर घरासाठी राबून जेव्हा रात्री सगळं जग शांत झोपतं, तेव्हाही तुझं मन शांत नसतं. रात्री उठून आमच्या अंगावर पांघरूण घालणं, आम्ही सुरक्षित आहोत ना हे पाहणं, आणि मनोमन आमच्या चांगल्या भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणं... तुझा हा पहारा कधीच संपत नाही.
**तिने नऊ महिने पोटात ठेवून आपल्याला जन्माला घातलं खरं, पण तिचं संपूर्ण आयुष्य ती आपल्याला तिच्या हृदयातच जगवते.*
मित्रांनो, खरं सांगायचं तर आईची किंमत आणि तिचे कष्ट आपल्याला खूप उशिरा कळतात. आपण आपल्या जगात, आपल्या मित्रांमध्ये इतके व्यस्त होतो की, घरातल्या एका कोपऱ्यात आपल्या एका शब्दासाठी वाट पाहणारी आई आपल्याला दिसतच नाही.
पैसा, प्रतिष्ठा, यश सगळं काही पुन्हा मिळवता येईल... पण निस्वार्थ प्रेम करणारं 'आई' नावाचं हे आभाळ एकदा हरवलं की पुन्हा कधीच मिळत नाही.
वेळ काढा, तिच्याशी बोला आणि आजच तिला सांगा— *"आई, तुझं आमच्यावर खूप प्रेम आहे, आणि आम्हांला तुझा अभिमान आहे!"* ��
- Abhijit Jadhav, Mumbai.
Advertisement

Where is it happening?

Mumbai, India., India

Event Location & Nearby Stays:

Know what’s Happening Next — before everyone else does.
 \u0938\u093e\u0935\u0927 \u0910\u0915\u093e - Listen Carefully
Host or Publisher सावध ऐका - Listen Carefully

Ask AI if this event suits you